[PMMVY]प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना : महिलांना मिळते 6 हजार रुपयांची आर्थिक मदत | ही आहे पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया

[PMMVY] प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2023: pmmvy in marathi, pmmvy Scheme ऑनलाइन अर्ज, Matru Vandana Yojana Form, Pradhan Mantri Matritva Vandana Yojana Application Form, पंतप्रधान मातृत्व वंदना योजना महाराष्ट्र,

केंद्र सरकार असो कि राज्य सरकार समाजातील सगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना अमलात आणत असतात. आणि सरकारी योजनांच्या मार्फत अनेक आर्थिक सुविधा लोकांपर्यंत पोहचवत असतात. या सरकारी योजनामध्ये अलग अलग वर्गासाठी अलग अलग प्रकारच्या योजना राबविल्या जातात. पंतप्रधान मातृत्व वंदना योजना(PMMVY) पण गरोदर मातांना आर्थिक सहाय्य म्हणून राबवली जाणारी एक सरकारी योजना आहे.

आपल्या देशातील बहुसंख्य गरीब कुटुंबाना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी अंग-मेहनतीची कामे करावी लागतात. ह्या कुटुंबातील महिला पण पुरुषाच्या बरोबरीने काम करत असतात. अशा महिलांपैकी अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतर शारीर‍िक क्षमता नसतानाही स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते. अशा गरीब महिलांना गरोदरपणात आर्थिक सहाय्य म्हणून केंद्र सरकार प्रधानमंत्री मातृ वंदना योजना राबवत आहे.

आज आपण या लेखात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना काय आहे? या योजनेत महिलांना किती आर्थिक सहाय्य मिळते? योजनेसाठी पात्रता काय आहे? लागणारे कागदपत्रे कोणती? आणि अर्ज कसा करायचा? या सर्व प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. जर आपण या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यास उत्सुक असाल तर शेवटपर्यंत आम्हा बरोबर राहा.

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना काय आहे? what is pradhanmantri matru vandana yojana[pmmvy]

pmmvy Scheme, pradhanmantri matrutv vandana yojana
pradhanmantri matrutv vandana yojana

आपल्या देशातील अधिकतर गरीब महिलांना स्वत: च्या उदरनिर्वाहसाठी मोल मजुरी करावी लागते, यामध्ये गरोदर महिला पण शामिल असतात. ज्यांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तसेच प्रसुतीनंतर शारीर‍िक क्षमता नसतानाही स्वतःचे पोट भरण्यासाठी मजुरी करावी लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करुन त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावे व माता मृत्यू व बालमृत्यू दरात घट होऊन ती नियंत्रित रहावी, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात लागू केली आहे.

देशभरातील गर्भवती आणि स्तनदा महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून पंतप्रधान मातृत्व वंदना योजनाची शुरुवात 1 जानेवारी 2017 रोजीच्या देशभरात लागू करण्यास मान्यता देण्यात आली. ही एक केंद्र पुरस्कृत योजना आहे जी महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे चालवली जात आहे.

pmmvy full form – pradhan mantri matrutv vandana yojana

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे उद्दिष्ट

कोणतीही सरकारी योजना सुरू करण्यामागे एक उद्देश असतो हे आपणा सर्वांना माहीत आहे, त्याचप्रमाणे ही योजना सुरू करण्यामागील उद्देश खालीलप्रमाणे आहे.

  • गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणात आणि स्तनदा करण्याच्या काळात स्त्रियांची काळजी, प्रोत्साहन देण्यासाठी.
  • बाळंतपणच्या सुरुवातीच्या महिन्यांत महिलांना त्यांचे स्तनदा आणि त्यांच्या पोषणाविषयी माहिती देणे.
  • तसेच गरोदर आणि स्तनदा मातांना उत्तम आरोग्य आणि पोषणासाठी रोख प्रोत्साहन देणे.
  • कुपोषण रोखणे आणि गरोदर स्त्रिया आणि स्तनदा महिला आणि त्यांच्या मुलांमधील मृत्यूदर कमी करणे.

हे पण वाचा ; नमो शेतकरी महा सन्मान मधून मिळणार 6000 रुपये, जाणून घ्या पात्रता व बंधनकारक बाबी

महिलांना किती आर्थिक सहाय्य मिळते?

गरोदर व स्तनदा मातांना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेंतर्गत 5 हजार रुपयांची आर्थिक सहाय्य म्हणून देण्यात येते. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यात रोख लाभ दिला जातो, ह्यासाठी कि, गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर लागणाऱ्या पौष्टिक आहाराची कमतरता पूर्ण केली जावी.

या योजनेचा मुख्य उद्देश आई आणि तिच्या मुलाची काळजी घेणे आहे, ज्यासाठी सरकार त्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत देते. सरकार गरोदर महिलांना त्यांच्या गर्भधारणेच्या आणि प्रसूतीच्या वेळी आर्थिक मदत करते.

या योजनेंतर्गत तीन टप्पे आहेत, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसर्‍या टप्प्यात 2000 रुपये गरोदर महिलांना सरकार आर्थिक मदत करते. उर्वरित 1000 रुपये सरकार त्या महिलेला जननी सुरक्षा योजने अंतर्गत तेव्हा देते जेव्हा गर्भवती महिलेने तिच्या मुलाला कोणत्याही रुग्णालयात जन्म दिले असेल.

  • पहिला टप्पा : अंगणवाडी केंद्रात किंवा आरोग्य सुविधेवर गर्भधारणेची नोंदणी करण्यासाठी 1000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
  • दुसरा टप्पा : गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर, 2000 रुपयांचा दुसरा हप्ता दिला जातो.
  • तिसरा टप्पा : 2000 चा तिसरा हप्ता मुलाच्या जन्माची नोंदणी आणि लसीकरणाच्या वेळी दिला जातो. उर्वरित 1000 रुपये रुग्णालयात प्रसूतीनंतर जननी सुरक्षा योजनेंतर्गत रुग्णालया कडून देण्यात येतो.

या योजनेसाठी लागणारी पात्रता

  • 19 वर्षावरील गरोदर महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
  • गर्भपात / मृत जन्माच्या बाबतीत, लाभार्थी त्याच्या उर्वरित हप्त्यांसाठी पात्र असेल.
  • राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नियमितपणे काम करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र नसणार.
  • प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना (PMMVY) अंतर्गत गर्भवती आणि स्तनदा महिला अर्ज करू शकतात.
  • या योजनेत गरोदर व स्तनदा अंगणवाडी सेविका महिला अर्ज करू शकतात.
  • लाभार्थी आणि त्‍याच्‍या पतीचा आधार कार्ड क्रमांक देणे अनिवार्य असेल.

काय लागतील कागदपत्रे

  • लाभार्थी महिलेने स्वतःची आणि तिच्या पतीची रीतसर स्वाक्षरी केलेले हमीपत्र/संमती पत्र द्यावे लागेल.
  • मोबाईल नंबर – मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असावा.
  • बँक खाते तपशील
  • MCP कार्ड (माता-बाल संरक्षण कार्ड)
  • लाभार्थी आणि तिचा पती यांच्या ओळखीचा पुरावा (आधार कार्ड किंवा दोघांचे ओळखपत्र)
  • दुसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, गर्भधारणेच्या 6 महिन्यांनंतर किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी दर्शविणारी MCP कार्डची छायाप्रत
  • तिसऱ्या हप्त्याचा दावा करण्यासाठी, लाभार्थीकडून मुलाच्या जन्म नोंदणीची एक प्रत आणि मुलाने लसीकरणाची पहिली फेरी पूर्ण केली असल्याचे दर्शवणारे MCP कार्ड.

हे पण वाचा ; Mutual Fund क्या हैं | ये है म्यूचुअल फंड के फायदे और नुकसान

अर्ज करण्याची प्रक्रिया

जर तुम्ही प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2023 (PMMVY) च्या सर्व अटी पूर्ण करत असाल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याची प्रक्रिया येथे दिली आहे:

  • सर्वप्रथम या योजनेचा अर्ज प्राप्त करावा.
  • हा फॉर्म तुम्ही अंगणवाडी केंद्रातून किंवा आरोग्य सुविधा केंद्राला भेट देऊन मिळवू शकता.
  • किंवा wcd.nic.in या महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता.
  • फॉर्मवर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमची कागदपत्रे जोडावी लागतील आणि ती अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधा केंद्रात जमा करावी लागतील.
  • अंगणवाडी केंद्र किंवा आरोग्य सुविधाद्वारे तुम्हाला एक पोचपावती दिली जाईल जी तुम्हाला भविष्यासाठी तुमच्याकडे ठेवावी लागेल.

FAQS – प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2023

आता आम्ही आपल्याला काही प्रश्न आणि उत्तरांद्वारे माहिती देऊ जेणेकरून आपल्याला ही योजना समजणे सोपे होईल.

प्रश्नः प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेत आर्थिक सहाय्यचा निधी कसा प्रदान केला जाईल?
उत्तरः या योजनेत तीन हप्त्यांमध्ये निधी प्रदान केला जाईल. हप्ते निहाय माहिती यापूर्वीच उपलब्ध करुन दिली गेली आहे.

प्रश्नः प्रधान मंत्री मातृत्व वंदना योजनेचे पैसे कसे तपासावेत?
उत्तरः या योजनेच्या पैशांची देखील ऑनलाइन तपासणी केली जाऊ शकते. यासाठी, आपल्याला अधिकृत वेबसाइटवर जाऊन शोधावे लागेल.

प्रश्नः या योजनेत कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
उत्तरः यासाठी फॉर्म -1, 2 आणि 3, एमसीपी कार्ड, बँक कॉपी आणि एक ओळखपत्र आवश्यक आहे.

प्रश्नः आपण या योजनेसाठी अर्ज कसा करू शकता?
उत्तरः आपण या योजनेसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही अर्ज करू शकता. आपण आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रातून अर्ज मिळवू शकता आणि आपण समान अर्ज सबमिट करू शकता.

Get PMMVY Scheme Details in marathi || PMMVY Yojana in marathi || PM Matritva Vandana Yojana details

आशा करतो कि, आपल्याला pradhanmantri matrutv vandana yojana ची संपूर्ण माहिती मिळाली असेल. आणि आपण पण घरातील किंवा शेजारील गरोदर महिलांना या योजनेची माहिती देणार.

हे पण वाचा ;

Post Office Loan कैसे ले | ये है आवश्यक पात्रता, दस्तावेज और आवेदन प्रक्रिया

क्या है PM Mudra Loan योजना | मुद्रा लोन के लिए अप्लाई कैसे करे | स्वरोजगार के लिए कितना मिलेगा लोन

Online Kamai source: ऑनलाइन कमाईचे 5 अप्रतिम मार्ग, घरी बसून करा काम, दररोज कमवा मोठी रक्कम

Leave a Comment