Maha E Seva Kendra || महा ई सेवा केंद्र || maha e seva kendra registration || maha e seva kendra apply || maha e seva kendra near me ||
आजचे युग हे डिजिटल युग आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. आणि आणि या डिजिटल युगात शासकीय असो किवा निमशासकीय अधिकतर सेवा online केल्या जातात. आपल्या लोकांना चांगल्या सरकारी सेवा मिळाव्यात यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारांकडून सर्व सेवा डिजीटल केल्या जात आहेत. आणि जवळपास सर्व सरकारी कामाच्या प्रक्रियेचे संगणकीकरण केले आहे. जेणेकरून शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना कमी वेळेत अधिक चांगल्या पध्दतीने मिळू शकेल.
प्रत्येक राज्याने आपल्या लोकांच्या सोयीसाठी विविध प्रकारचे पोर्टल आणि योजना सुरू केल्या आहे. महाराष्ट्र शासनाने पण आपल्या शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना कमी वेळेत अधिक चांगल्या पध्दतीने मिळाव्या यासाठी Maha E Seva Kendra ही योजना सुरू केली आहे. याद्वारे महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना विविध प्रकारच्या शासकीय सेवांचा लाभ मिळू शकणार आहे.
आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या ह्या महा ई-सेवा केंद्र योजनेबद्दल थोडक्यात सांगणार आहोत. सोबतच या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नागरिकांना महा ई सेवा केंद्र उघडून रोजगार कसा मिळू शकतो. या केंद्रांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना विविध प्रकारच्या शासकीय सेवा-सुविधांचा लाभ ऑनलाइन पद्धतीने सहज कसे मिळू शकणार आहे ह्याविषयी पण चर्चा करणार आहोत. जर तुम्ही स्वतःचे महा ई-सेवा केंद्र शुरू करण्याचा विचार करत असाल तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. या लेखात आम्ही जवळ जवळ महा ई सेवा केंद्राशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे.
महा ई सेवा केंद्र म्हणजे काय?

What is Maha e Seva Kendra : भारत सरकारचा डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र शासनाने Maha E Seva Kendra सुरू केले आहे. याद्वारे राज्यातील सर्व नागरिकांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळू शकणार आहे. ही सुविधा एका सामायिक सेवा केंद्रासारखी असेल, येथून सर्व नागरिकांना जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, परवाना, पासपोर्ट इत्यादी आवश्यक कागदपत्रांसाठी अर्ज करता येणार आहे. सर्व प्रकारच्या सरकारी योजनांशी संबंधित सुविधा महा ई सेवा केंद्रात उपलब्ध असतील, जे अधिकृतपणे खाजगी व्यक्तींद्वारे चालवले जातील. सर्व नागरिकांना या केंद्रांवरून लोकांना सर्व शासकीय व निमशासकीय सेवांचा लाभ घेता येणार असून, ज्यासाठी त्यांना यापूर्वी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात जावे लागत होते.
महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्यातील नागरिकांना सोयीसुविधा तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र महा ई-सेवा केंद्र सुरू केले आहे, ज्यामध्ये इच्छुक नागरिक अर्ज करून आपला स्वयंरोजगार सुरू करू शकतात. यासोबतच ही केंद्रे सुरू झाल्याने आवश्यक कागदपत्रांसाठी अर्ज करणे, पासपोर्ट आणि परवान्यासाठी अर्ज करणे आदी अनेक सेवांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या योजनेंतर्गत इच्छुक लोक राज्यात कुठे ही त्यांचे महा ई सेवा केंद्र उघडू शकतात आणि ई सेवा केंद्राच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील लोकांना विविध प्रकारच्या शासकीय सेवांचा लाभ मिळवून देण्यास मदत करू शकतात आणि यामार्फत पैसे देखील कमवू शकतात.
महा ई-सेवा केंद्राचा उद्देश
Purpose of Maha e-Seva Kendra: महा ई सेवा केंद्र शुरू करण्याचा महाराष्ट्र शासनाचा हा उद्देश आहे की, सर्व शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना कमी वेळेत अधिक चांगल्या पध्दतीने एकाच ठिकाणी मिळाव्यात आणि पात्र नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावा. याद्वारे राज्यातील सर्व पात्र नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार असून इतर नागरिकांना शासकीय सुविधांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. यापूर्वी नागरिकांना आवश्यक शासकीय कामासाठी वेगवेगळ्या कार्यालयात जावे लागत होते, त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात होते. आता महा ई-सेवा केंद्र सुरू झाल्याने नागरिकांना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही, त्यांना एकाच ठिकाणी विविध प्रकारच्या शासकीय सुविधांचा लाभ घेता येणार आहे. यासोबतच, जे तरुण स्वत:चा रोजगार सुरू करतील त्यांच्यासाठी हे एक अतिशय फायदेशीर पाऊल ठरेल, कारण याद्वारे ते स्वत:ला स्वावलंबी बनवू शकतील.
महा ई सेवा केंद्राचे फायदे व वैशिष्ट्ये
Maha E Seva Kendra Advantages and Features
- महा ई सेवा केंद्र द्वारे सर्व शासकीय सेवांचा लाभ राज्यातील नागरिकांना कमी वेळेत अधिक चांगल्या पध्दतीने मिळू शकेल.
- महा ई-सेवा केंद्र शुरू करून राज्यातील सुशिक्षित तरुण रोजगार मिळवू शकणार आहे.
- याद्वारे सर्व नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार, ज्यासाठी त्यांना यापूर्वी विविध कार्यालयांमध्ये जावे लागत होते.
- याद्वारे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार असून त्याच बरोबर शासकीय कार्यालयांच्या कामकाजात पारदर्शकता येणार आहे.
- या योजनेअंतर्गत अर्ज करून स्वतःचे सेवा केंद्र उघडू इच्छिणारे पात्र इच्छुक नागरिक त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- महा ई सेवा केंद्रामुळे नागरिकांना उत्पन्नाचे खात्रीशीर साधन मिळणार असून, त्यामुळे त्यांना सहज जीवन जगता येणार आहे.
- या योजनेच्या माध्यमातून राज्यात डिजिटलायझेशनला चालना मिळणार आहे.
हे पण वाचा ; महिला सन्मान योजना : महिलांसाठी MSRTC बस भाड्यात 50% सवलत | जाणून घ्या नियम व अटी
महा ई सेवा केंद्रासाठी आवश्यक पात्रता
Maha e Seva Kendra Eligibility : जर तुम्ही महा ई-सेवा केंद्र उघडायचे विचार करत आहे, तर तुम्हाला खाली नमूद केलेल्या पात्रता निकषांचे पालन करावे लागेल ;
- अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचा नागरिक राज्यात राहतो, तो महा ई सेवा केंद्राचा लाभ घेण्यास पात्र असेल. - अर्जदाराने मान्यताप्राप्त शाळेतून कमीत कमी दहावी उत्तीर्ण केलेली असावी.
- अर्जदाराला आपली मातृभाषा लिहिता-वाचता येत असावी, तसेच त्याला इंग्रजी भाषेचे प्राथमिक ज्ञान असावे.
- स्वत:ची नोंदणी करण्यासाठी अर्जदाराला संगणक कौशल्याचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
महा ई सेवा केंद्रासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे
Important Documents Required for Maha E Seva Kendra
- अर्जदाराचे आधार कार्ड
- रहिवासी दाखला
- उत्पनांचा दाखला
- वयाचा पुरावा
- दहावीची गुणपत्रिका
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- मोबाईल नंबर
- ई – मेल आयडी
महा ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
जर तुम्ही महा ई सेवा केंद्र नोंदणी(maha e seva kendra registration) करू इच्छिता तर खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करावे ;
- सर्वप्रथम तुम्हाला शासनच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. यानंतर वेबसाइटचे होमपेज तुमच्यासमोर ओपन होईल.
- वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला “New User Register Here” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज येईल. येथे विचारलेली माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी लागेल.
- आता तुम्हाला या पेजवरील “Option One किंवा Option 2” मधून कोणताही एक पर्याय निवडावा लागेल. तुम्ही “पर्याय एक” निवडल्यास, तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि ओटीपी प्रविष्ट करावा लागेल आणि “वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड” प्रविष्ट करावा लागेल. तुम्ही “पर्याय 2” निवडल्यास, या प्रकरणात तुम्हाला अर्ज तपशील, पत्ता, मोबाइल नंबर, छायाचित्रे इत्यादी आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल.
- आपल्या इच्छेनुसार निवड केल्यानंतर, संबंधित माहिती प्रविष्ट करा. यानंतर तुम्हाला तुमचे महत्त्वाचे दस्तऐवज अपलोड करावे लागतील आणि “नोंदणी” या पर्यायावर क्लिक करा.
- अशा प्रकारे सोप्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही तुमचा अर्ज पूर्ण करू शकाल.
हे पण वाचा ; नमो शेतकरी महा सन्मान मधून मिळणार 6000 रुपये, जाणून घ्या पात्रता व बंधनकारक बाबी
Vle लॉगिन प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या सरकारच्या अधिकृत वेबसाइट वर जावे लागेल. यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल.
वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला vle login या पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर Vle लॉगिन पेज उघडेल.
या पृष्ठावर तुम्हाला विचारलेल्या माहितीचा तपशील प्रविष्ट करावा लागेल जसे की- वापरकर्ता आयडी, पासवर्ड, कॅप्चा कोड इ.
आता तुम्हाला login च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुम्ही लॉगिन करू शकता.
महा ई सेवा केंद्र सुरु करण्यासाठी परवाना कसा मिळेल?
maha e seva kendra licence process in marathi : आपल्याला जर महा ई सेवा केंद्र आपल्या शहरात सुरू करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला,
- जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते,
- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन सर्व कागदपत्रांसह अर्ज करावा लागेल,
- त्यानंतर तुम्हाला महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी मिळते,
- जर तुम्ही आवश्यक कागदपत्रे आणि इतर प्रक्रिया पूर्ण केल्या तर तिथून तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल.
महा ई सेवा केंद्र मोबाइल एप्प डाउनलोड प्रक्रिया
- सर्व प्रथम तुम्हाला गुगल प्ले स्टोअर ओपन करावे लागेल.
- गुगल प्ले स्टोअर मध्य महा ई सेवा महाराष्ट्र ई सेवा सर्च करा व डाऊनलोड करा.
- व आपल्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागेल
- इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही वापरू शकता.
महा ई सेवा केंद्राची यादी पाहण्याची प्रक्रिया
maha e seva kendra near me: सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट mahaonline वर जावे लागेल. यानंतर वेबसाइटचे होमपेज तुमच्यासमोर ओपन होईल.
वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. यानंतर, तुम्हाला त्यात तुमचा तालुका देखील निवडावा लागेल.
सर्व तपशील भरल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर महा ई सेवा केंद्राची यादी तुमच्या समोर उघडेल. अशा प्रकारे तुम्ही जवळच्या महा ई सेवा केंद्रांची(maha e seva kendra list) यादी पाहू शकणार.
महा ई सेवा केंद्र उघडण्यासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता
- किमान 120GB हार्ड डिस्क ड्राइव्ह
- किमान 512MB RAM
- सीडी डीव्हीडी ड्राइव्ह
- 4 तासांचा बॅटरी बॅकअप
- प्रिंटर कलर प्रिंटर
- वेबकॅम डिजिटल कॅमेरा
- परवानाकृत Windows XP-SP2 किंवा त्यावरील ऑपरेटिंग सिस्टमसह UPS PS
- इंटरनेटवर डेटा ब्राउझिंग आणि अपलोड करण्यासाठी किमान 128 Kbps च्या गतीसह इंटरनेट कनेक्शन
सरते शेवटी (सारांश)
आशा करतो, तुम्हाला महा ई सेवा केंद्रा विषयी आवश्यक संपूर्ण माहिती मिळाली असेल. आणि तुम्ही स्वत:चे महा ई सेवा केंद्र शुरू करून रोजगार तयार कराल.
हे पण वाचा ;
Fiverr काय आहे | Fiverr च्या मदतीने पैसे कमवा(online earning website)
Online Kamai source: ऑनलाइन कमाईचे 5 अप्रतिम मार्ग, घरी बसून करा काम, दररोज कमवा मोठी रक्कम