msrtc 50 concession for ladies, महिला सन्मान योजना : आपल्या राज्यातील महिलांच्या आरोग्यासाठी त्यांच्या उन्नतीसाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी राज्य सरकार वेळोवेळी आपल्या राज्यातील जनतेसाठी विविध योजनांची अमलबजावणी करत असते. वेळोवेळी नवीन नवीन योजनांची घोषणा करून जनतेच्या सेवेत तत्पर असते. शिंदे-फडणवीस सरकार कडून महिलांसाठी एक योजना राबवली जात आहे. ती म्हणजे राज्य परिवहनच्या बसेस मध्ये 50 टक्के सवलत(half ticket for ladies in msrtc) देत आहे.
एसटी महामंडळाची लालपरी ही ग्रामीण भागाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. शाळेतील विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठापर्यंत लालपरी सर्वांना आपल्या ठिकाणापर्यंत पोहचवते. एसटी प्रवास सुरक्षित असतो यामुळेच अनेक महिला देखील एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. एसटीतर्फे 65 वर्ष पूर्ण झालेल्यांना अर्धा तिकिटाच्या रकमेत प्रवास होता. त्यानंतर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत 75 वर्षीय ज्येष्ठांना सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवास सवलत देण्यात आली आहे व त्यानंतर आता महिलांना देखील 50% तिकीटात सूट देण्याच निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आजच्या लेखात आपण महिला सन्मान योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजने बद्दल जाणून घेणार आहोत. महिला सन्मान योजना काय आहे? या योजने मागचे उद्देश काय? Half Ticket For Woman कसे मिळवणार? अशा अनेक प्रश्नांवर विचार करणार आहोत.
बस भाड्यात(MSRTC) 50% सवलत योजना काय आहे?

ST Bus Half ticket for Woman Overview : महाराष्ट्र राज्याच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. आणि शिंदे-फडणवीस सरकारने ती पूर्ण पण केली आहे. सरकारचा हा एक उत्तम निर्णय आहे. महिलांना आता राज्यातील एसटीमध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे. ज्यामुळे महिला तिकिटांच्या ५० टक्के दरात राज्यात प्रवास करू शकतात. यापूर्वी केवळ ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात सवलत दिली जात होती मात्र आता या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार महिलांनाही अर्ध्या भाड्यात राज्यात कुठे ही प्रवास करता येणार आहे. यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिलांना हाफ तिकिटात प्रवास करता येणार असून, एसटीच्या प्रवासात कोणतीही अट घालण्यात आलेली नाही.
एसटीच्या तिकिटामध्ये सवलत देताना पूर्वी काही अटी घातल्या जात होत्या. विशिष्ट वयोमर्यादा असणाऱ्या ज्येष्ठांनाच कमी तिकिटाचा लाभ घेता येत होता. मात्र, सरकारने महिलांसाठी घोषित केलेल्या ५० टक्के तिकिटाच्या सवलतमध्ये कोणतीही अट ठेवली नाही. सरसकट सर्वच महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत मिळणार आहे.
महिलांना प्रवास करताना सुरक्षित प्रवासाची हमी एसटीमध्ये मिळतेच. त्यात आता महिलांना एसटीने तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली असल्याने पूर्वीपेक्षा अधिक महिला एसटीने प्रवास करतील, त्यामुळे एसटीचे उत्पन्नदेखील वाढेल.
आपल्याला हे पण आवडेल ; [PMMVY]प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना : महिलांना मिळते 6 हजार रुपयांची आर्थिक मदत | ही आहे पात्रता व अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेचा उद्देश काय?
राज्यातील महिलांना तसेच सर्व नागरिकांना एस टी मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित तसेच प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महिला सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास करणे.
- महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
- राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारणे.
- राज्यातील महिलांना तसेच इतर नागरिकांना एस टी मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे.
महिला सन्मान योजनेचे वैशिष्टय[Mahila Sanman Yojana Maharashtra Features]
- ST च्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यात आली आहे
- महाराष्ट्र राज्यातील महिलांचा जीवनमान सुधारण्यासाठी तसेच त्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यासाठी सदर योजना महत्वाची ठरणार आहे.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना कुठल्याच प्रकारचा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- या योजनेचा लाभ राज्यातील सर्व जाती धर्मातील महिला घेऊ शकतात त्यासाठी त्यांना कुठल्याच प्रकारची प्रवर्गाची अट ठेवण्यात आली नाही आहे.
MSRTC च्या कोणत्या बसेस मध्ये MSRTC 50% Concession लागू आहे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये महिला प्रवाशांना ५०% सवलत मिळणार आहे. यामध्ये साधी, मिनी बस, निमआराम म्हणजेच एशियाड गाडी, विनावातानुकुलित शयन-आसनी म्हणजे नॉन एसी स्लिपर कोच एसटी बस, आणि शिवशाही, शिवनेरी, शिवाई या तिन्ही साध्या आणि एसी बसमध्ये 50 टक्के सवलत 17 मार्चपासून लागू करण्यात आली आहे…
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेसकरताही ही सवलत लागू असणार. महिलांसाठी सवलत असलेल्या तिकीटाची रंगसंगती वेगळी असणार आहे.
आपल्याला हे पण आवडेल ; Online Kamai source: ऑनलाइन कमाईचे 5 अप्रतिम मार्ग, घरी बसून करा काम, दररोज कमवा मोठी रक्कम
खासगी ट्रॅव्हल्सचा देखील महिला प्रवाश्यांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय
एसटी महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशांना 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घोषित केला आणि त्याच्या अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे. आता त्यापाठोपाठ चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनशी संलग्न असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी देखील आपल्या बसमध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे.
महिला सन्मान योजनेसाठी आवश्यक पात्रता[Mahila Sanman Yojana Eligibility]
महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त दुसरा कोणताच पात्रता निकष ठेवण्यात आला नाही. राज्यातील कोत्याही जातीची, धर्माची महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते.
महिला सन्मान योजनेचा लाभ[Benefits of MSRTC Concession, Mahila Sanman Yojana Benefits]
महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येते.
- ज्या महिला नेहमीच लांब पल्ल्याचा प्रवास करतात, त्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
- या योजनेअंतर्गत राज्यातील महिला सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- राज्यातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास होईल.
- राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारेल.
- राज्यातील महिला तसेच इतर प्रवाशी एस टी ने प्रवास करण्यासाठी आकर्षित होतील.
- 50 टक्के सवलत मिळवून महिला राज्यभर प्रवास करू शकतील.
महिला सन्मान योजनेच्या अटी व शर्ती [Mahila Sanman Yojana Terms & Condition]
msrtc ladies half ticket rules
- फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- या योजनेअंतर्गत महिलांना एस टी प्रवासासाठी 100 टक्के सवलत दिली जाणार नाही महिलांना तिकीटाची किमान 50 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे.
- फक्त 75 वर्षावरील महिलांनाच तिकीट दरात 100 टक्के सवलत देण्यात येईल.
- सदरची सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दी पर्यंत अनुज्ञेय राहील.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील प्रवासासाठी सदर योजना लागू नाही.
- सदर सवलत शहरी वाहतुकीस अनुज्ञेय नाही.
- msrtc reservation मध्ये पण ही सवलत लागू होणार नाही. म्हणजे प्रवास करतानाच तुम्हाला लगे हात तिकीट काढून या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो
आपल्याला हे पण आवडेल ; Post Office Loan कैसे ले | ये है आवश्यक पात्रता, दस्तावेज और आवेदन प्रक्रिया
महिला सन्मान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे[Mahila Sanman Yojana Documents]
सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना कुठल्याच कागदपत्रांची आवश्यकता नाही.
७५ वर्षांवरील महिलांना त्यांचे आधार कार्ड किंवा जेष्ठ नागरिक कार्ड प्रवासादरम्यान सोबत ठेवणे आवश्यक आहे.
FAQ – महिला सन्मान योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
1) महिला सन्मान योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे.?
महिला सन्मान योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
2) महिला सन्मान योजनेचा लाभ काय आहे.?
या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना सर्व प्रकारच्या एस टी बसेसमधून प्रवास करण्यासाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येते.
3) महिला सन्मान योजनेचे लाभार्थी कोण आहेत.?
राज्यातील सर्व महिला महिला सन्मान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्र आहेत.
4) महिला सन्मान योजनेचा उद्देश काय आहे?
राज्यातील महिलांना तसेच इतर नागरिकांना एस टी मधून प्रवास करण्यासाठी आकर्षित करणे.
सरते शेवटी
आम्ही आशा करतो कि तुम्हाला महिला सन्मान योजनेची संपूर्ण माहिती मिळाली आहे. आणि आपण पण जेव्हा एसटी प्रवास करणार तेव्हा या योजनेची लाभ घेणार.
आपल्याला हे पण आवडेल ;
नमो शेतकरी महा सन्मान मधून मिळणार 6000 रुपये, जाणून घ्या पात्रता व बंधनकारक बाबी