नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023, नमो शेतकरी योजना 2023, नमो शेतकरी सन्मान निधी योजना अर्ज krishi yojana, navin yojana :– आपला देश हा एक कृषीप्रधान देश आहे, व जवळ जवळ 75% लोक शेती वर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक स्थिती शेतीवरच अवलंबून असते, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून 2019 साली प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना शुरू केली होती. आता प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना यंदा सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. मे अखेरीस पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
भारत सरकारच्या 2023-24 च्या अर्थसंकल्पांतर्गत दरवर्षी महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र यांनी केली आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील 1.5 कोटी पेक्षा जास्त शेतकर्यांना फायदा होणार आहे.
आज आम्ही या लेखातून महाराष्ट्र सरकारचा ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत? अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते? या योजनेसाठी कोणते निकष ठेवण्यात आले आहे? अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? या सर्व बाबींवर चर्चा करणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपये मिळणार

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 ची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 मार्च रोजी सन 2023-24 च्या अर्थसंकल्पांतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी केली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपयांच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ही आर्थिक मदत रक्कम तीन सन्मान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना दिली जाईल. आणि आर्थिक मदतीची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 6000 रुपये आणि महारष्ट्र सरकारकडून 6000 रुपये मिळून आता राज्यातील पात्र सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपयांची आर्थिक मदत शेतीसाठी मिळणार आहे. या योजनेअंतर्गत सरकारने 6900 कोटी रुपये खर्च केले आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील 1.5 कोटी शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारेल.
लाभार्थी शेतकऱ्याला ‘या’ 3 बाबींची पूर्तता करणे बंधनकारक
पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे. राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते लिंक करून घ्यावे; अन्यथा त्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.
पीएम किसान योजनेतील लाभार्थीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस तथा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
- योजनेचे नाव – नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना
- PM किसान + नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना – 12000 थेट लाभ 2023
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा
- लाभार्थी – राज्यातील शेतकरी
- उद्देश – शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणे
- आर्थिक सहाय्याची रक्कम – 6,000 रुपये
- दीड कोटी शेतकरी कुटुंबांना – लाभ दिला जाईल
- राज्य – महाराष्ट्र
- वर्ष – 2023
- अर्ज प्रक्रिया – आता उपलब्ध नाही
- अधिकृत वेबसाइट – लवकरच लॉन्च होत आहे
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचे उद्दिष्ट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपयांचे आर्थिक सहाय्य देणे हे आहे. जेणेकरुन राज्यातील शेतकऱ्यांना उत्तम उपजीविका उपलब्ध करून त्यांना सक्षम व स्वावलंबी बनवता येईल. याशिवाय, शेतकऱ्यांचा विमा सरकार 1 रुपये प्रीमियमवर काढेल. आम्ही तुम्हाला सांगतो की, प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांकडून 2 टक्के विम्याचा हप्ता घेतला जातो. परंतु शेतकऱ्यांना पीक विम्याच्या हप्त्याच्या फक्त १ टक्के रक्कम महाराष्ट्र सरकार भरावी लागणार आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर दरवर्षी 3212 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन स्वावलंबी बनवणे हे सरकारचे एकमेव ध्येय आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 फायदे आणि वैशिष्ट्ये
- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेसारखीच एक योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला महारष्ट्र सरकारकडून वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाणार आहे.
- ही आर्थिक मदत रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर पाठवली जाईल.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला 12000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. यातील 50% महाराज सरकार आणि बाकी 50% केंद्र सरकार देईल.
- या दोन्ही योजनांद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.
- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल.
- दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होतील.
- याशिवाय शेतकऱ्यांचा विम्याचा हप्ताही महाराष्ट्र सरकार भरणार आहे.
- राज्यातील 1.5 कोटी शेतकरी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- दरवर्षी 6900 कोटी रुपये या योजनेसाठी सरकार खर्च करणार आहे.
- या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देऊन स्वावलंबी होणार आहे.
- या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्रता
केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधी शेतकरी वगळून सर्वांना योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 अंतर्गत, फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र मानले जातील.
शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी.
अर्जदार शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.
अर्जदार शेतकऱ्याचे बँक खाते असणे बंधनकारक आहे जे आधार कार्डशी जोडलेले असावे.
या 3 बाबी बंधनकारक
- 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र
- सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल
- लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी
- बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
- मूळ पत्ता पुरावा
- आधार कार्ड
- बँक खाते तपशील
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जमिनीची कागदपत्रे
- रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 2023 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्याद्वारे राज्यातील शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6 हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही योजना अद्याप सुरू झालेली नाही, तसेच या योजनेंतर्गत अर्जासंबंधित कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट सुरू केलेली नाही. याशिवाय या योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जासंबंधीची कोणतीही माहिती महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक केलेली नाही. सरकारकडून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेशी संबंधित माहिती मिळताच, आम्ही तुम्हाला लेखाद्वारे माहिती देऊ. जेणेकरून या योजनेअंतर्गत अर्ज करून तुम्हाला लाभ मिळू शकेल.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना लाभार्थी स्थिती तपासा
- सर्व प्रथम, आपण अधिकृत वेबसाइटवर जा.
- तुमच्या स्क्रीनवर अधिकृत वेबसाइटचे होम पेज उघडताच तुम्हाला लाभार्थी स्थितीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
- सर्व माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- आता संबंधित माहिती तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजने संबंधित 5 महत्त्वाचे प्रश्न
प्रश्न 1 – ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ काय आहे?
उत्तर – केंद्र सरकार देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये इतकी आर्थिक मदत देते. दर 4 महिन्यांच्या अंतरानं 2 हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो. आता राज्य सरकार केंद्र सरकारच्या या 6 हजार रुपयांमध्ये आणखी 6 हजार रुपयांची भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील. ही योजना अशी आहे.
प्रश्न 2 – या योजनेचा लाभ कुणाला मिळणार?
उत्तर – 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच या योजनेसाठी पात्र असतील. अर्थात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकार जेवढे पैसे या लाभार्थ्यांना देतं, तितकेच राज्य सरकारही देणार आहे.
प्रश्न 3- योजना कधीपासून व कशी लागू होणार?
उत्तर – केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी जारी करण्यात आला. या योजनेच्या कार्यपद्धतीनुसार, पुढचा हप्ता एप्रिल ते जुलै 2023 दरम्यान जारी केला जाईल. आता केंद्राच्या पुढील हप्त्यातच राज्य सरकार त्यांच्या वाट्याची रक्कम टाकून शेतकऱ्यांना देणार, की वेगळी काही कार्यपद्धती अवलंबणार, हे मात्र या योजनेचा शासन निर्णय आल्यावरच स्पष्ट होईल.
प्रश्न 4 -किती शेतकऱ्यांना लाभ होणार?
उत्तर- ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबाना होणार, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
प्रश्न 5 – पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी काय करायला हवं?
उत्तर – पीएम किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. राज्यात असे 12 लाख शेतकरी असे आहेत, ज्यांचं बँक खातं अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाहीये. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी ताबडतोड त्यांचं बँक खातं (ज्या खात्यात पीएम किसान योजनेचे पैसे येतात) आधार नंबर आणि फोन नंबरशी लिंक करून घ्यावं. नाहीतर त्यांना राज्य सरकारच्या योजनेचे पैसे मिळण्यास अडथळे येऊ शकतात.
सरते शेवटी(सारांश)
लेखातील लेखाप्रमाणे, आम्ही नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 2023 शी संबंधित सर्व माहिती तुमच्यासोबत शेअर केली आहे, तुम्हाला या माहितीशिवाय इतर कोणतीही माहिती हवी असल्यास, तुम्ही खाली दिलेल्या कमेंट विभागात मेसेज करून विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळतील. आम्ही दिलेल्या माहितीतून तुम्हाला मदत मिळेल अशी आशा आहे.
हे पण वाचा ;
Online Kamai source: ऑनलाइन कमाईचे 5 अप्रतिम मार्ग, घरी बसून करा काम, दररोज कमवा मोठी रक्कम
Mutual Fund क्या हैं | ये है म्यूचुअल फंड के फायदे और नुकसान
SBI YONO App से तुरंत मिलेगा लोन | घर बैठे मोबाइल के जरिए ऐसे कर सकते हैं आवेदन